Ad will apear here
Next
गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे
हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांचे आवाहन
हिमायतनगर : येथील नृसिंह किड्स वर्ल्ड इंग्लिश स्कूलमध्ये गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी १५०हून अधिक विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

२७ नोव्हेंबर २०१८ रोजी सुरू झालेल्या रोजी गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेतून आठ हजार ५०० बालकांना लसीकरण केले जाणार आहे. गोवर-रुबेलामुळे येणारे अपंगत्व आणि अन्य दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याचा समूळ नायनाट होण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. सर्वांनी सहकार्य करून ही लसीकरण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले. लसीकरणाचा शुभारंभ राठोड यांच्या हस्ते करण्यात आला. 

या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक एस. एम. गायकवाड, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. शेळके, सहायक गटविकास अधिकारी सुदेश मांजरमकर, पोलीस उपनिरीक्षक काळे, वैद्यकीय अधिकारी डी. डी. गायकवाड, डॉ. अलकाराणी मुनेश्वर, डॉ. अविनाश गुंडाळे, डॉ. सुचित मामीडवार, डॉ. ज्ञानेश्वर कदम, डॉ. भुरके, डॉ. वाळके, रमेश धांडे, नृसिंह इंग्लिश स्कूलचे संचालक संजय मारावार आदींसह शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, आरोग्य कर्मचारी, नर्स, सिस्टर आदींसह पालकांची उपस्थिती होती. त्यानंतर येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.           

प्रभातफेरी काढून दिला लसीकरणाचा संदेश
तत्पूर्वी हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिरापासून शहरातील मुख्य रस्त्याने आरोग्य विभागाच्या पुढाकारातून लसीकरणाचा संदेश देणारी प्रभातफेरी काढण्यात आली. त्याचा शुभारंभ तहसीलदार आशिष बिराजदार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZLIBU
Similar Posts
‘गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा’ हिमायतनगर : ‘संपूर्ण भारतात आरोग्य विभागामार्फत गोवर-रुबेला मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या योजनेची महाराष्ट्रात २७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरुवात होत आहे. हिमायतनगर तालुक्यातील जनतेने आपल्या लहान मुलांना ही लस देऊन या योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आव्हान हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ
‘हेमंत पाटील यांच्या विजयासाठी एकजुटीने काम करू’ हिमायतनगर : ‘शिवसेना-भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया-राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा
हिमायतनगरच्या तीन नगरसेवकांना दिलासा हिमायतनगर : नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीवेळी तिसऱ्या आघाडीच्या शिवसेना उमेदवाराला मतदान करून पक्षासोबत बंडखोरी केल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाच्या मो. जावेद गनी, शमीमबानो अनवर खान पठाण व सुरेखा सदाशिव सातव तीन नगरसेवकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केले होते. या आदेशाला २१ फेब्रुवारी २०१९ रोजी नगर
पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी हिमायतनगर : हिमायतनगर नगरपंचायतीअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेमधील १२१५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी ७० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे शहरात नगरपंचायत अस्तित्वात आल्यापासून प्रतीक्षेत असलेल्यांना दिवाळीची भेट मिळाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language